शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

महागाव (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील अंबोडा येथील अल्पभूधारक शेतकरी उमाजी भीमराव पाटे यांनी आज सकाळी शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती नागपूर-तुळजापूर राज्यमार्गाला लागूनच आहे.

चौपदरीकरणाच्या प्रक्रियेत पाटे यांची 20 गुंठे शेतजमीन शासनाकडून संपादित केली जाणार आहे. शेतीच्या फेरफारसाठी पाटे यांनी तलाठ्याकडे सहा महिन्यांपूर्वी प्रकरण सोपविले होते. परंतु महसूल प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्या शेतीचा फेरफार प्रलंबित होता. रात्री शेतात जागलीसाठी गेल्यानंतर सकाळी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

Web Title: farmer suicide