शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

दारव्हा (जि. यवतमाळ) - खरीप हंगामात पेरणीसाठी पैशांची तजवीज होत नसल्याने शेतकऱ्याने जाळून घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्‍यातील पिंपळखुटा येथे आज दुपारी घडली. धनराज उल्हास चव्हाण (वय 38) असे मृताचे नाव आहे. धनराज काल धामणगाव येथील स्टेट बॅंकेत कर्ज मागण्यासाठी गेला होता. बॅंक व्यवस्थापकाने "तुमच्याकडे जुने कर्ज आहे, त्याची परतफेड आधी करा, नंतरच कर्ज मिळेल', असे सांगितले. पेरणीच्या विवंचनेत धनराजने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
Web Title: farmer suicide