सरण रचून शेतकऱ्याने संपवले जीवन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

सिंदखेडराजा - स्वत:चे सरण रचून एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज (ता. २९) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावखेड तेजन येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन अर्जुन जायभाये (वय ३५) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या शेतात जाळून घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे. मृत शेतकऱ्याकडे तीन एकर जमीन होती. तो पत्नी व मुलांसह राहत होता. त्याच्यावर बँकेचे सुमारे ७० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. सरणाजवळ कीटकनाशक आणि रॉकेलचा डबा आढळून आला आहे. 

घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संतोष नेमणार यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत.

Web Title: farmer suicide by bank loan