शेतमजूर रवींद्र इंगळे यांची विषप्राशन करून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

रवींद्र इंगळे यांचे नावावर शेती नसली तरी वडिलांचे नावे शेती असून त्यावर ५० हजार रुपयाचे बँकेचे कर्ज आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात असलेल्या व शेतमजुरीतून उदरनिर्वाह करणाऱ्या रवींद्र इंगळे याने काही वर्षांपूर्वी किराणा दुकानासाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र बँक शेंबा शाखेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज काढले होते.

नांदुरा : तालुक्यातील टाकरखेड येथील शेतमजूर रवींद्र राजाराम इंगळे (वय ५०) वर्षे याने आर्थिक विवंचनेपायी ३० एप्रिल रोजी राहत्या घरी राऊंडअप नामक विषारी औषधप्राशन करून आत्महत्या केली.

रवींद्र इंगळे यांचे नावावर शेती नसली तरी वडिलांचे नावे शेती असून त्यावर ५० हजार रुपयाचे बँकेचे कर्ज आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात असलेल्या व शेतमजुरीतून उदरनिर्वाह करणाऱ्या रवींद्र इंगळे याने काही वर्षांपूर्वी किराणा दुकानासाठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र बँक शेंबा शाखेकडून ४० हजार रुपयांचे कर्ज काढले होते. परंतू त्या कर्जाची परतफेड होत नसल्याने व शेत मजुरीतूनही संसाराचा गाडा हाकलने कठीण झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. त्यांना आईवडील, भाऊ, दोन मुले व एक मुलगी असून एका मुलाचा नुकताच हात मोडला असल्याने त्याचा उसणवारीतून दवाखाना करावा लागला आहे.

Web Title: farmer suicide in Buldhana