अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ता.27 जून रोजी दुपारी उघडकीस आली. राम देविदास वानखडे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

पातुर्डा - बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ता.27 जून रोजी दुपारी उघडकीस आली. राम देविदास वानखडे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

राम वानखडे यांच्या नावे पातुर्डा येथील खेळ दळवी शिवारात एक गुंठा शेती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्रेत तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी मृतक शेतकऱ्याच्या भावाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राम वानखडे या शेतकऱ्याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र आद्याप कळू शकले नाही.

Web Title: Farmer Suicide in buldhana district

टॅग्स