दर्यापुरात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

दर्यापूर (अमरावती) :  जुन्या दर्यापुरातील भवानीवेश येथील शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. बळीराम दत्तूजी खंडारे (वय 46) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
दोन एकर शेती आणि लागवडीने केलेली सहा एकर शेती यंदा दुबार पेरावी लागली. त्यातही आता पीक येईल की नाही, याची शक्‍यता नाही. त्यातच अंगावर असलेले सोसायटीचे कर्ज व नातेवाइकांकडून उधार घेतलेले पैसे फेडण्याची चिंताही त्यांना सतावत होती.
बळीराम खंडारे यांना दोन मुली आहेत. त्यांच्या शिक्षणाचा व लग्नाच्या विचाराने ते खचले होते.

काल रात्री जेवण झाल्यावर बाजूला असलेल्या गोठ्यात झोपावयास जातो, असे सांगून मध्य रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतावर जाण्यासाठी सकाळी सहकाऱ्याने हाक दिली असता कोणतेही उत्तर मिळाले नाही. गोठ्यात जाऊन बघितले असता श्री. खंडारे यांनी गळफास लावल्याचे दिसून आले. दर्यापूर पोलिसांनी पंचनामा करीत शवविच्छेदनासाठी पाठविले. तहसीलदार अमोल कुंभार, पटवारी प्रकाश शहाळे, नगरसेवक अमोल गहरवार आदींनी भेट दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicide in daryapur