आत्महत्या अपात्रतेवरच भर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

अमरावती - विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अपात्र ठरवण्यावरच अधिक भर देण्यात येत आहे. त्यामुळे कर्तापुरुष गमावल्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या थोड्याफार आर्थिक मदतीपासूनही आत्महत्याग्रस्त कुटुंबास वंचित राहण्याची वेळ आली आहे. गेल्या १७ वर्षांत सहा जिल्ह्यांतील ५५ टक्के आत्महत्या शासकीय मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आल्या.

२००१ ते २०१८ या १७ वर्षांत पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ व पूर्व विदर्भातील वर्धा या सहा जिल्ह्यांत १३ हजार ५६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ६ हजार १२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या. ७ हजार ४३५ शेतकरी अपात्र ठरले. अपात्रतेची टक्केवारी ५५ च्या जवळपास आहे. वर्ष २०१४ पर्यंत काँग्रेस सरकारच्या कालावधीतील सरकारची प्रतिमा जपण्याची ही पद्धत भाजप सरकारच्या काळातही कायमच राहिली. 

सत्तांतरपूर्व व सत्तांतरानंतरच्या नऊ वर्षांच्या कालावधीत ८ हजार ४४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र की अपात्र, हे ठरविण्याच्या निकषांत मात्र बदल झाले नाहीत.  काँग्रेसच्या कालावधीत पात्रतेच्या निकषांवर टीका करणारे सत्तेत आल्यानंतर बदल अपेक्षित होते. 

वर्ष २०१० ते नोव्हेंबर २०१४ या काँग्रेसच्या सत्ताकाळात ४ हजार ३१४ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. त्यातील २,४४७ अपात्र ठरविण्यात आल्या. त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या २०१५ ते १८ जून २०१८ या कालावधीत ३,७३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी २,०६३ शेतकरी आत्महत्या अपात्र घोषित झाल्या. या सरकारच्या कारकिर्दीत अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांची टक्केवारी ४२ आहे.

वर्ष - शेतकरी आत्महत्या - अपात्र प्रकरणे
२१०१ - १०५१ - ८००
२०११ - ८८६ - ५५८
२०१२ - ८४२ - ४६२
२०१३ - ७०५ - ३६८
२०१४ - ८३० - २५९
२०१५ - १,१८४ - ३५५
२०१६ - १,१०३ - ५६२
२०१७ - १,०६६ - ५२०
१८ जून २०१८ - ४१३ - १२६

Web Title: farmer suicide government help