शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

मोहदा (जि. यवतमाळ) - येथून जवळच असलेल्या किन्हाळा (ता. कळंब) येथील शेतकरी राजू ठाकूरसिंग जाधव (वय 45) यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आपल्या शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही घटना काल घडली.

राजू यांनी कीटकनाशक प्याल्याचे लक्षात आल्यावर नातेवाइकांनी त्यांना मेटिखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी प्रथमोपचार करून त्यांना यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: farmer suicide Insecticide