विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

दारव्हा (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पिंपळखुटा येथील शेतकऱ्याने शनिवारी (ता. 27) विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. भाऊराव रामाणी चव्हाण (वय 45) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. सोबतच दुसऱ्याची शेतीसुद्धा ते मक्‍त्याने करीत होते.

शुक्रवारी (ता. 26) रात्री भाऊराव हे शेतात जागलीसाठी गेले होते. परंतु, सकाळी ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता शेताला लागून असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. चव्हाण यांच्यावर बॅंकेसह इतरही कर्ज असल्याची माहिती त्यांचा भाऊ दिलीप रामाणी चव्हाण यांनी पोलिसांना दिली.
आजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
आकोली (जि. वर्धा) : लगतच्या म्हसाळा येथील तरुण शेतकरी विजय मुकुंद सपकाळ (वय 35) यांनी शनिवारी (ता. 27) पहाटे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सपकाळ काही वर्षांपासून कर्करोगाने पीडित होते. ते मूळचे नवरगाव येथील असून, त्यांचे शेत व्याघ्र प्रकल्पात गेल्याने ते म्हसाळा येथे वास्तवास आले होते. पुनर्वसनाच्या वेळी मिळालेली रक्‍कम त्यांच्या उपचारावरच खर्च झाल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली व आप्तपरिवार आहे. याप्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicide by jumping into the well