नागपूर जिल्ह्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याच्या व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रातील मौद्या तालुक्यातील पिपरी खंडाला या गावात ही घटना घडली आहे.

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मैद्या तालुक्यातील पिंपरी खंडाला या गावात एका तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याच्या व राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानसभा क्षेत्रातील मौद्या तालुक्यातील पिपरी खंडाला या गावात ही घटना घडली आहे. तरुण शेतकरी व कृषी केंद्राचे संचालक शंकर हरी किरपान (वय 35) यांनी शुक्रवारी दुपारी 2 वाजता नापिकी व कर्जाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: farmer suicide in Nagpur