कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने आपल्याच शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 11) दुपारी एकच्या सुमारास सावरखेड (ता. नायगाव) येथे घडली. 

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने आपल्याच शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 11) दुपारी एकच्या सुमारास सावरखेड (ता. नायगाव) येथे घडली. 

नायगाव तालुक्यातील सावरखेड येथील शेतकरी व्यंकट प्रकाश ढगे (वय 30) यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतावर कष्ट करून चालायचा. परंतु सतत नापिकी होत असल्याने प्रपंच चालविण्यासाठी त्यांच्या व वडिलांच्या नावे कर्ज काढले. शेतात निसर्ग साथ देत नसल्याने मागील चार वर्षापासून सतत नापिकी होत होती. यामुळे काढलेल्या कर्जाची परतफेड त्यांना करणे अशक्य झाले होते. यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 

बुधवारी दुपारी ते आपल्या शेतावर गेले. नैराश्‍येतून त्यांनी विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी सुरेश मारोती ढगे यांच्या माहितीवरुन कुंटूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक बिरादार पुढील तपास हे करीत आहेत. 

Web Title: farmer suicide in nanded