यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

यवतमाळ - सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यातील कळंब व बाभूळगाव तालुक्‍यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.
कळंब तालुक्‍यातील नरसापूर येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना 31 ऑक्‍टोबरला घडली. प्रवीण उदेभान ठाकरे (वय 38) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबतची तक्रार कळंब पोलिस ठाण्यात संजय ठाकरे यांनी दिली. प्रवीण यांनी शेतात विष प्राशन केले. त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांच्यावर बडौदा बॅंकेचे एक लाखाचे कर्ज आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे.

दुसऱ्या घटनेत, बाभूळगाव तालुक्‍यातील येरंडगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. 2) घडली. ज्ञानेश्‍वर चिंधूजी नेहारे (वय 55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी बुधवारी मध्यरात्री कीटकनाशक प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे. सततची नापिकी व दुष्काळाने ते हैराण होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी कलावती, मुलगा वैभव (वय 30), मुलगी सुनीता असा आप्तपरिवार आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी ठाणेदारांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवली. त्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Farmer suicide in Yavatmal district