कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

दारव्हा (जि. यवतमाळ) : डुकराने तीन एकर शेतामधील कापूस पिकाचे नुकसान केले. कर्जमाफीही न झाल्याने मुंडळ येथील शेतकरी मुरलीधर नारायण राऊत (वय 55) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 18) सकाळी उघडकीस आली.

मुरलीधर राऊत यांच्या तीन एकरांतील कापूस पिकाची डुकराने नासाडी केली. त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. यामुळे नैराशाने त्यांनी स्वतःच्या शेतात बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास विष घेतले. ही बाब शेजारीच शेतात काम करीत असलेल्या त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने तिने आरडाओरड केली. ग्रामस्थांनी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer suicide in yavatmal district