कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

राजुरा (जि. चंद्रपूर) : कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तालुक्‍यातील मूर्ती येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी घडली. प्रवीण फाकरू डाखरे (वय 37) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मागीलवर्षी कोरडा दुष्काळ पडला. उत्पादन घटले. त्यामुळे मनात नैराश्‍य होते. मात्र, यावर्षी चांगले पीक येईल, या आशेने प्रवीण डाखरे यांनी सेवा सहकारी संस्था चिंचोली येथून 50 हजार रुपयांचे कर्ज घेतले. घरातील सोने बॅंकेत गहाण ठेवले. नवीन हंगामात लागवड केली. पीकही चांगले आले. मात्र, सततच्या पावसाने पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे नैराश्‍यातून डाखरे यांनी 29 सप्टेंबरला विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicides by debt consolidation