चिल्लर न मिळाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

तिवसा (अमरावती) - बॅंकेत पाचशे व हजारांच्या नोटेची चिल्लर मिळण्यासाठी प्रचंड मानसिक त्रास होत आहे. यात शेतकरी सुटले नाहीत. मजुरांचा चुकारा व सोयाबीन काढणीसाठी थ्रेशर मालकाला पैसे कसे द्यायचे, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्याला हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना नजीकच्या शेंदोळा येथे रविवारी (ता. 13) सकाळी साडेसातला घडली. 

सुभाष अंबादास बांबल (वय 50) हे शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे. कुटुंबांचा उदरनिर्वाह याच शेतीवर चालतो. पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने त्या घेण्यास कुणीच तयार नाही. मजुरांची मजुरी व थ्रेशर मालकाचे पैसे देण्यासाठी घरात पैसे असताना त्याचा फायदा होत नाही. त्या बदलून घेण्यासाठी सुभाष बांबल यांनी गावातीलच बॅंकेत खूप प्रयत्न केले; मात्र चार हजारांवर पैसे बदलून मिळत नसल्याचे काहींनी त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांना धक्का बसला. छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 

चुकाऱ्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या 

मजुरांचा चुकारा करण्यासाठी शंभरच्या नोटा नसल्याने मोर्शी तालुक्‍यातील अंबाडा येथील शेतकरी संजय ज्ञानेश्‍वर खातदेव (वय 50) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अंबाडा येथील शेतकरी संजय खातदेव यांच्या शेतात 10 ते 12 मजूर काम करीत होते. तथापि, या मजुरांना आठवड्याला बाजाराच्या दिवशी पैसे द्यायचे होते. मात्र, शासनाने हजार व पाचशेच्या नोटा बंद केल्याने व त्यांना नोटांचे सुटे न मिळाल्याने चुकारा कसा करायचा, यासाठी ते चिंतेत होते. शिवाय मजुरांना पैसे दिले नाहीत तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो, याची कल्पना शेतकरी खातदेव यांना होती. त्यामुळे मनस्ताप होऊन त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. 

Web Title: Farmer's death for coin