सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

वरुड (जि. अमरावती) : जनावरांना चारा टाकताना, विषारी सापाने पायाला दंश केल्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 13) सकाळी ही घटना घडली. नारायण विश्राम बहुरूपी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

राजुरा बाजार येथील बहुरूपी यांची शिरपूर येथे शेती आहे. सकाळी 6 वाजता घरून शेतात गेले होते. त्यांनी बैल गोठ्यातून काढून मोकळ्या जागेत बांधले. चारा टाकण्यासाठी ते खाली वाकले असतानाच विषारी सापाने त्यांच्या पायाला चावा घेतला. त्यांना वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी अमरावतीला हलविले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा आप्तपरिवार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's death by snake bite