धान उत्पादक शेतकऱ्यांपुढे पाण्याचे संकट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नागपूर - यंदा पाऊस कमी झाल्याने पेंच येथील जलसाठ्यातही मोठी घट झाली आहे. भंडारा व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाच्या रोवण्या करण्यासाठी तूर्तास १०० दलघमी पाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतु पुढील काळात पाऊस न आल्यास रोवण्यांसाठी ऑक्‍टोबरमध्ये शेतकऱ्यांना पाणी देणे शक्‍य होणार नाही, असे नमुद करीत उर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकटाचे संकेत दिले. 

पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, पेंच धरणाअंतर्गत सध्या ६० टक्के रोवण्या थांबल्या आहे. पेंचमध्येही पाणी नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरणातून पाणी देणे बंद केले. मात्र, तुर्तास रोवण्याकरिता १०० दलघमी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांनी या पाण्याचा वापर रोवण्यांसाठीच करावा, असे आवाहन करताना पालकमंत्र्यांनी पेंच व तोतलाडोह येथे जलसाठ्यात वाढ न झाल्यास ऑक्‍टोबरमध्ये देण्यात येणारे पाणी देता येणार नाही, असे सांगितले. पाऊस न आल्यास ऑक्‍टोबरमध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार नाही. पेंच धरणाअंतर्गत येणाऱ्या पाणी वाटप संस्थांना या संकटासाठी सरकार जबाबदार नाही, असे लिंहून द्यावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री करणार मध्य प्रदेश सरकारशी चर्चा 
पावसामुळे उद्‌भवलेल्या स्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी चौराई धरणातून पाणी मिळावे, यासाठी मध्य प्रदेश सरकारशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. पुढील आठवड्यात ही चर्चा होईल. मध्य प्रदेश सरकारसोबत १९७३-७४ मध्ये झालेल्या करारावर चर्चा होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Web Title: farmers face water crisis