वाढत्या किडीला कंटाळून शेतकऱ्याने पीकच काढले मोडीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कपाशीवरील वाढता किडीचा प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील खारपाण पट्ट्यात येत असलेल्या निरोड येथील शेतकऱ्याने एक एकर कपाशी पीक मोडीत काढले आहे. कपाशी पेरणी करून अडीच महिने होऊनही वाढ होत नसून त्यावरील किडीचा अटॅक कमी होत नसल्याने खर्च वाढविण्या पेक्षा कपाशी वर रोटाव्हॅटर फिरवून पिकच मोडीत काढल्याचा प्रकार 28 आगस्ट रोजी निरोड येथे दिसून आला.

संग्रामपूर(बुलढाणा) - कपाशीवरील वाढता किडीचा प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील खारपाण पट्ट्यात येत असलेल्या निरोड येथील शेतकऱ्याने एक एकर कपाशी पीक मोडीत काढले आहे. कपाशी पेरणी करून अडीच महिने होऊनही वाढ होत नसून त्यावरील किडीचा अटॅक कमी होत नसल्याने खर्च वाढविण्या पेक्षा कपाशी वर रोटाव्हॅटर फिरवून पिकच मोडीत काढल्याचा प्रकार 28 आगस्ट रोजी निरोड येथे दिसून आला.

अनंत देशमुख ह्या शेतकऱ्याने निरोड शिवारात एक एकर कपाशी ची पेरणी केली होती. बदलत्या वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने फवारणीचा महागडा खर्च झेपावणारा नसल्याने आणि कपाशीची वाढ ही होत नसल्याने देशमुख यानी अखेर कपाशीवर रोटाव्हॅटर फिरवून पिकच मोडून काढले. या भागात खारपान पट्ट्या मूळे भूगर्भातील पाण्याची पातळी आटत आहे.

कोरडवाहू शेती निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे कोणतेही पीक मशागत आणि महागडा खर्च करून येईलच याची शास्वती नसल्याने या भागातील शेतकरी हतबल होत आहेत. यंदा कपाशी बाबत शेतकऱयांमध्ये कमालीची भीती असल्याने बोंडअळी आणि किडीने चिंता वाढवली आहे.

Web Title: farmers facing bondAli problem in Buldhana district