शेतकरीच जगाचा पोशिंदा : आर्थिक अडचणीतही खरीप हंगामाची चिंता

शेतकरीच जगाचा पोशिंदा : आर्थिक अडचणीतही खरीप हंगामाची चिंता

यवतमाळ : कोरडा व ओला दुष्काळाशी (Dry and wet drought) दोन हात करीत असताना कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत (Farmers in financial difficulties) आणखी भर पडली आहे. गेल्या वर्षी खरीप व रब्बी हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आता खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पेरणीसाठी लागणारे बियाणे व खते खरेदीसाठी पैसा आणायचा कुठून, ही चिंता शेतकऱ्यांना (Farmers ) सतावत आहे. (Farmers in Yavatmal district are worried about the kharif season)

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. शेतातून माल घरात आला. मात्र, त्यातून लागवडखर्चही निघू शकला नाही. खरिपातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कंबर कसली. एक हंगाम साथ देईल, या आशेवर जगत असताना शेतकऱ्यांची वारंवार निराशाच होत आहे. त्यातच एक वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गापासून शेतकरी सुटू शकले नाहीत.

शेतकरीच जगाचा पोशिंदा : आर्थिक अडचणीतही खरीप हंगामाची चिंता
Big News : रविवारपासून जीवनावश्‍यक दुकाने ‘अनलॉक’; १ जूनपर्यंत सूट

कित्येकांना बाधा झाल्याने औषधोपचारावर खर्च करावा लागला. त्यातून बरे झालेल्यांचे पाऊल खरीप हंगामाच्या लागवडीकडे वळले. हातात पैसा नसल्याने पीककर्ज मिळविण्यासाठी शेतकरी बॅंकांचे उंबरठे झिजवीत आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंका दरवर्षीप्रमाणे पीककर्ज वाटपात आखडता हात घेत आहेत. दरवर्षीचा अनुभव बघता शेतकऱ्यांना खासगी सावकारांच्या दारात जावे लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पेरणीच्या वेळी पैसा उपलब्ध न झाल्यास खते व बी-बियाण्यांसाठी कुठून तजवीज करावी, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

सततच्या नापिकीमुळे शेतकरी कर्जात बुडाले. एकही हंगामातून शेतकऱ्यांच्या पदरात दोन पैसे शिल्लक पडत नाहीत. गेल्या वर्षी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. आता खरीप हंगामासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्‍न आहे. बॅंकांकडून वेळेवर पीककर्ज मिळत नाही. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज देऊन दिलासा द्यावा.
- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ

(Farmers in Yavatmal district are worried about the kharif season)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com