ठिबकच्या अनुदानास अनेक शेतकरी मुकणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नागपूर : गेल्या दोन-तीन वर्षांपासून नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या बळिराजाला आता सरकारच्या धोरणाचा फटका सहन करण्याची पाळी आली आहे. कृषी विभागाची पूर्वसंमती न घेता ठिबक आणि तुषार सिंचनाचे संच लावणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील लाखावर शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून मुकणार आहेत.

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन कार्यक्रमांतर्गत ठिबक व तुषार योजना कृषी विभागाकडून राबविली जाते. 2015-16 या कालावधीत विदर्भातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केले. ठिबक संचाकरिता 35 हजार रुपये, तर तुषार संचाकरिता 18 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. यासाठी आधी शेतकऱ्यांना स्वत:चे पैसे लावून संच खरेदी करावे लागतात. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्‍कम जमा केली जाते. परंतु राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वीच या दोन्ही योजनांत थोडे बदल केले. संच खरेदी करण्यापूर्वीच शेतकऱ्यांना कृषी विभागाची पूर्वसंमती घेणे अनिवार्य केले. 2015-16 कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती घेतली नाही, त्यांना अपात्र ठरवीत अनुदान न देण्याचा निर्णय घेतला.

त्या संबंधीचे पत्र नुकतेच कृषी विभागाला दिले. परिणामी विदर्भातील 1 लाख 3 हजार 238 शेतकऱ्यांना संचखरेदीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

Web Title: farmers to loose subsidy of drip