शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

नागपूर ः विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती या शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्‍यक आहे. जनावरांना संतुलित आहार, पशुखाद्यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य असणऱ्या पशुखाद्यांची लागवड शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

वनामती सभागृहात विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ व मूर फार्म यांच्यात राशन बॅलेसिंग ऍडव्हायझरी प्रोग्राम व व्हाइट टेक ऍप्लिकेशन संदर्भातील त्रिपक्षीय सामंजस्य कराराप्रंसगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्य पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव अनुप कुमार उपस्थित होते. गडकरी म्हणाले, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने येथील मदर डेअरीतर्फे संत्रा मावा बर्फीचे उत्पादन सुरू केले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना संत्रा व दूध या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. विमानतळावर या संत्रा बर्फीचे स्टॉल्स लावल्यास दोन हजार किलो संत्रा बर्फी विक्री होऊ शकेल. विदर्भात सुमारे सहा हजार मालगुजारी तलाव असून त्यातील गोड्या पाण्यात कोळंबी व मासे उत्पादन घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करता येतील असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी राज्य पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग प्रयत्नशील आहे, मूर फार्मतर्फे विदर्भाच्या वर्धा, अमरावती व नागपूर जिल्ह्यात राबविला जाणारा दुग्धविकास प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभरातही व्हावा, अशी सूचना दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली. प्रास्ताविकात विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे संचालक रवींद्र ठाकरे यांनी राशन बॅलेसिंग ऍडव्हायझरी प्रोग्रामबद्दल माहिती दिली. या प्रोग्रामअंतर्गत फूड व फॉडर डाटा संकलित केला जात असल्याने दुग्धउत्पादकांना प्रती जनावर 25 रुपये खर्च कमी येतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच विदर्भाच्या वर्धा, अमरावती व नागपूर जिल्ह्यात हे प्रकल्प राबविल्या जात असल्याचे मूर फार्मच्या आशना सिंग यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers should turn to agribusiness