आर्णी तालुक्‍यात कीटकनाशकाच्या विषबाधेने शेतकरीपुत्राचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

आर्णी (जि. यवतमाळ) : शेतात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा झाल्याने शेतकरीपुत्राचा मृत्यू झाला. ही घटना आर्णी तालुक्‍यातील उमरी (पठार) येथे घडली. यंदाच्या खरीप हंगामात नेर तालुक्‍यातील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. मृताची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.
गजानन मारोती डोंगरे (वय 45, रा. उमरी पठार) असे मृताचे नाव आहे.

वडिलांच्या नावे असलेल्या सात एकर कपाशी पिकावरील शेतात त्याने गुरुवारी (ता. पाच) कीटकनाशक फवारणी केली. फवारणी करून सायंकाळी घरी परतल्यावर गजाननला शुक्रवारी (ता. सहा) मळमळ होत उलटीचा त्रास सुरू झाला. त्याला तत्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याच दिवशी रात्री साडेदहाला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तपासणी करताच डॉक्‍टरांनी गजाननला मृत घोषित केले. वडिलांच्या नावे असलेली सात एकर शेतीची वहिती करून गजानन कुटुंबाचा गाडा ओढत होता. मृताच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, लहान भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's son dies of pesticide poisoning in Arni taluka