सुकलेले धान पऱ्हे पाहून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

शंकरपूर (जि. चंद्रपूर) : गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही. पावसाअभावी पिके सुकत चालली आहेत. शेतातील सुकलेले धानाचे पऱ्हे पाहून एका शेतकऱ्याने शेतातील विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. रवींद्र संभाजी लहाने (वय 48) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 22) रात्रीच्या सुमारास घडली.

रवींद्र लहाने यांची शंकरपूर येथे शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी धान लावले. जून महिन्यात थोडा पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर त्यांनी धान लावले. मात्र, जून, जुलै महिन्यात पाऊस झाला नाही. सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे धानाचे पऱ्हे सुकत चालले होते. सोमवारी (ता. 22) रवींद्र लहाने सकाळी शेतावर गेले. मात्र, रात्री आठ वाजेपर्यंत घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या शेताच्या बाजूनेच विहीर आहे. याच विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्यावर बॅंक व खासगी बॅंकेचे कर्ज होते. दररोज ते शेतावर जात होते. पाण्याअभावी धान पऱ्हे सुकत चालल्याचे बघून ते अस्वस्थ होते. पावसाअभावी शेतीच पिकणार नसल्यामुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना होती. आधीच त्यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढले होते. त्यात शेतीसाठी कर्ज घेतले होते. कर्जाच्या चिंतेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. शंकरपूर पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. तलाठी आत्राम यांनी पंचनामा केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's suicide after dried paddy