नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या..मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

अमरावती  - अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सिद्धनाथपूर येथील 47 वर्षीय सुधाकर महादेवराव पाटेकर यांनी बुधवारी (ता.13)  विषप्राशन केले. उपचारादरम्यान आज गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. सुधाकर पाटेकर यांना तीन मुली, एक मुलगा आहे.

तीन एकर शेती असून यावर्षी सोयाबीन लागवड केली होती. पण पावसामुळे सोयाबीन खराब झाले. बँकेचं कर्ज सुद्धा या शेतकऱ्यावर आहे.  त्यामुळे याला त्वरित मदत मिळावी या करीता गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मृतदेह घेऊन आले व मदतीची मागणी केली. अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी मदतीची मागणी मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी हा मृतदेह उचलत गावी नेला. तब्बल 20 मिनिट जिल्हाधिकारी परिसरात हा मृतदेह पडून होता.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

ओला दुष्काळ जाहीर करा; बच्चू कडू आक्रमक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers suicide in amravati