चिंचोली गवळीतील शेतकऱ्याची आत्महत्या

File photo
File photo

मोर्शी (जि. अमरावती) : चिंचोली गवळी येथील अल्पभूधारक शेतकरी गुणवंत किसनराव गजभिये (वय 40) यांनी आपल्या धारूळ शिवारात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली.
गजभिये यांच्या विहिरीला पाणी नसल्यामुळे तीन एकरांतील संत्राझाडे वाळली. त्यातच कपाशीवर बोंडे व पात्या नसल्यामुळे उत्पन्नात प्रचंड घट येणार असल्याची त्यांना भीती होती. स्टेट बॅंक ऑफ इंडिया व इतर सावकारांचे कर्जही त्यांच्यावर होते. ते कसे फेडावे. तसेच दोन मुली लग्नाच्या असल्यामुळे त्यांचा सांभाळ कसा होईल, या विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com