शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

काटोल (जि.नागपूर) : येथील मनोहर दाजीबाजी रेवतकर (वय 45) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून बुधवारी शेतात गळफास लावून आत्महत्या केली.

काटोल (जि.नागपूर) : येथील मनोहर दाजीबाजी रेवतकर (वय 45) या तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणातून बुधवारी शेतात गळफास लावून आत्महत्या केली.
कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच असल्याने मनोहरने मृत्यूला कवटाळल्याचे चिठ्ठीमुळे पुढे आले. शेतकरी अल्पभूधारक असून बागपट्टी शिवारात त्यांची दोन एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी बॅंकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम परतफेड करता येत नसल्याने ते अनेक दिवसांपासून चिंतित होते. वाढत्या कर्जाचा डोंगर डोक्‍यावर असल्याने बुधवारी मनोहर घरून शेतात गेले. परंतु, रात्र होऊनही परत न आल्याने मनोहरची पत्नी व मुले चिंतित होती. त्यांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला. अखेर शेतातील गोठ्यात मनोहरचा मृतदेह फासावर लटकल्याच्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या पश्‍चात पत्नी कविता(40) व मुले सोनू (19), हिमांशू (14) असा आप्तपरिवार आहे. कर्ताच गेल्याने पीडित कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा आहे. शासनाने मनोहरच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी गणेश सावरकर, पुंडलिक चरडे, राजेश साठवणे व गावातील नागरिकांनी केली आहे,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's suicide by hugging