सही देण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांला पोलिसांची मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

तात काम करणाऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला सही करण्यासाठी सांगण्यात आले. त्याने नकार दिला. यामुळे संतापलेल्या एका पोलिसाने त्याला मारहाण केली. हा प्रकार समजताच गावकरी एकत्र आले. आपली काही खैर नाही हे लक्षात येताच पोलिसांनी पळ काढला.

गोंडपिपरी जि. चंद्रपूर - तेलंगणातून दारू आणणाऱ्या एकाला कुडेनांदगाव पाईंटवर धाबा पोलिसांनी पकडले. त्याच्यावर कार्यवाही केली. घटनेचा पंचनामा करण्यासाठी साक्षीदार म्हणून शेतात काम करणाऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला सही करण्यासाठी सांगण्यात आले. त्याने नकार दिला. यामुळे संतापलेल्या एका पोलिसाने त्याला मारहाण केली. हा प्रकार समजताच गावकरी एकत्र आले. आपली काही खैर नाही हे लक्षात येताच पोलिसांनी पळ काढला. यावेळी गावकऱ्यांनी अर्धा तास मार्गावर ठिय्या मांडत संताप व्यक्त केला. शेवटी ठाणेदारांच्या समन्वयाने हे प्रकरण शांततेत मिटले.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा, लाठी हे पोलिस स्टेशन दारुबंदीत संवेदनाशील ठरले आहे. जिल्ह्यात बंदी असलेल्या वस्तूंची तेलंगणातून या मार्गाने तस्करी केल्या जाते. त्यामुळे पोडसा, धाबा मार्गावर पोलिसांकडून वाहनांची चौकशी केल्या जाते. मात्र चौकशीचा नावावर काही पोलिस कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांना जेरिस आणल्याचे प्रकार येथे घडले आहे. मागील काही दिवसापासून धाबा ठाणे माध्यमातून प्रसिद्धीस आलेले असतांनाच पंचनाम्यावर साक्षरी करण्यास नकार दिलेल्या शेतकऱ्यास पोलिसांनी अकारण केलेल्या मारहाणीमुळे पोलिसाबाबत जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. हेटी नांदगावचा बसस्थानक परिसरात  वाहनांची चौकशी करण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात होते. दरम्यान हेटी नांदगाव येथील मारोती येलमुले हा शेतकरी शेतात जात असतांना कोवे, पेंन्दाम नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला बोलावले. पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. मात्र येलमुले यांनी स्वाक्षरी करण्यास नकार दिला. नकार ऐकून पोलिसांनी आपल्या मारहाण केली असे येलमुले यांनी सांगितले. येलमुलेला पोलिसाकडून मारहाण होत असल्याची माहिती गावात पोहोचताच गावकरी धावून गेले. गावकऱ्यांना येताना बघुन पोलिस कर्मचारी पळून गेले. पोलिसांचा हूकुमशाही विरोधात गावकऱ्यांनी मार्गावरील वाहने रोकुन संताप व्यक्त केला. दरम्यान धाबा उप पोलिस स्टेशनचे ठाणेदार महेद्र आंबोरे यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांना शांत केले. 

मी शेतात जात असतांना कोवे नामक पोलिसाने मला बोलावले. पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले. मी नकार दिला तेव्हा त्यांनी मला मारहाण केली. - मारोती येलमुले शेतकरी

ठाण्याची सूत्रे हातात घेवून मला जेमतेम दिवस झाले आहेत. यापुढे नाकाबंदीत मी स्वतः राहणार आहे. पोलिस स्टेशन हद्दीतील गावात दारुबंदी यशस्वीसाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. - महेंद्र अंबोरे ठाणेदार, धाबा
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Farmers who refuse to give the signature had beaten up by police