चौकशी टाळण्यासाठी शेती बंद!

file photo
file photo

धाबा (चंद्रपूर) : वाघीणीच्या मृत्यूला रानडुकर कारण ठरले. रानडुकराचा शिकारी कोण ? याचा तपास घेण्यासाठी वनविभागाने शेतकऱ्यांची चौकशी सुरू केली. चौकशीचा फेरा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातच जाणेच बंद केले. रानडुकरांपासून शेताचे रक्षण कसे करायचे, ते तुम्हीच सांगा असा प्रश्न करीत पोडसावासींनी ग्रामसभेचे नियोजन केले आहे. गावबैठक हा निर्णय घेण्यात येणार आहे.
गोंडपिपरी तालुक्‍यातील जुना पोडसा येथील शेतशिवारात वाघीण मृतावस्थेत आढळली. घटनास्थळापासून जवळच मृत रानडुकर पडून होते. रानडुकरावर विषप्रयोग झाला अन रानडुकराने विषारी मास खाल्याने वाघीणीचा मृत्यू झाला असा संशय वनविभागाला आहे. शेतातील पीक रानडुकर उद्‌ध्वस्त करते. त्यामुळे शेतकऱ्यांनीच विषप्रयोग केला, असा संशय वनविभागाला आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी पोडसा गावातील शेतकऱ्यांची चौकशी सुरू केली.
चौकशीचा फेरा टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आता शेतातच जाणे बंद केले. तिकडे शेतात रानडुकरांचा हैदोस सुरूच आहे. रानडुकरांचा बंदोबस्त कसा करायचा हा मोठा प्रश्न पोडसा गावातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. दरम्यान गावातील काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले. रानडुकरांचा विषयावर ग्रामसभा घ्यायची असे त्यांनी ठरविले. ग्रामसभेत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येणार आहे. रानडुकरांचा बंदोबस्त कसा करायचा आता तुम्हीच सांगा असा थेट सवाल गावकरी वनविभागाला करणार आहेत. गावकऱ्यांच्या प्रश्नावर वनविभागाचे काय उत्तर असेल याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.

शेतात रानडुकरांचा हैदोस सुरू आहे. वनविभागाच्या भीतीने शेतात जाणे शेतकरी टाळत आहेत.येत्या तीन चार दिवसात ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलाविले जाईल. रानडुकरापासून शेतीचे रक्षण कसे करायचे असा प्रश्न वनविभागाला आम्ही विचारणार आहोत.''
देविदास सातपुते,
उपसरपंच , पोडसा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com