वनहक्क पट्टे मिळाले, आता आधुनिक शेती करा : विभागीय आयुक्त

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे : वनहक्क प्रमाणपत्राचे वितरण
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे
विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारेsakal

गडचिरोली : वनहक्क पट्टे मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनासोबत संवाद साधून कृषी योजना तसेच बॅंकांची मदत घेऊन शेतीला आधुनिकतेची जोड द्या, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना त्या बोलत होत्या. आधुनिक शेतीला एकाने सुरुवात केली, तर ते पाहून इतरही शेतकरी पुढे येतील व यानंतर अजून गावे जोडली जातील. वनहक्क मिळाले. आता विविध योजनांची जोड देऊन मिळालेल्या संधीचा चांगला विनियोग करा, यातून निश्‍चितच आपले आर्थिक उत्पन्न वाढेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे
आधुनिक तंत्रज्ञान अवलंबून फायद्याची शेती करा : प्रविण माने

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. वन, नदी, नाल्यांनी वेढलेले निसर्गरम्य वातावरण असलेला हा जिल्हा आहे. स्थानिकांचा मूळ व्यवसाय हा शेती असून आदिवासी व इतर जमातींना उदरनिर्वाह होण्याच्या दृष्टीने शासनाने अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क कायदा २००६ अस्तित्वात आणला. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व मागास भागातील वनहक्क पात्र दावेदारांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी म्हणून जिल्हास्तरीय वनहक्क समितीमार्फत वनहक्क प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त लवंगारे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात १२ जणांना वनहक्क दावे वाटप केले. यामध्ये एटापल्ली तालुक्‍यातील ७ जणांना, तर आरमोरी तालुक्‍यातील ५ जणांना वनहक्क प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशीष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक कुमारस्वामी उपस्थित होते. उपस्थित लाभार्थ्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. आता आम्ही जास्त मेहनतीने शेती करून उत्पादन वाढवू असा, विश्‍वास त्यांनी उपस्थितांना दिला. संचालन दहिकर यांनी केले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम २००८, सुधारणा नियम २०१२ अंतर्गत वैयक्तिक दाव्यांचा अहवालानुसार वैयक्तिक वनहक्क दावे एकूण मंजूर (अपीलासह) ३१७९५ आहेत. त्यापैकी अनुसूचित जमाती १७१२९, इतर पारंपरिक १४६६६ असून एकूण क्षेत्र ३७,७४०.१७ हेक्‍टर, असे आहे. तसेच सामूहिक दाव्यांमध्ये जिल्हास्तरीय समितीने मान्य केलेले वनदावे एकूण १४२२ आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र ५,०३,३२२.११ हेक्‍टर आर. आहे.

विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवावर यंदा कोरोनाचं सावट; स्थानिक प्रशासनाच्या सूचनांची प्रतीक्षा 

गडचिरोलीतच घेतली सुनावणी

जिल्ह्यातील वनहक्क मागणी केल्यानंतर नामंजूर दावे अपिलात गेलेल्या दाव्यांवर विभागीय स्तरावर सुनावणी होते. यानुसार जिल्ह्यातील दुर्गम भागातील अपीलधारकांना उपस्थित राहता यावे म्हणून गडचिरोलीमध्ये विभागीय स्तरावरील सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे- वर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे सर्व उपस्थितांची सुनावणी घेतली. यावेळी विभागीय वनहक्क समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com