आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या एलसीबी पथकावर जीवघेणा हल्ला

polic halla.jpg
polic halla.jpg

बुलडाणा  : अमडापूर व साखरखेर्डा येथील चोरीच्या प्रकरणात संशयित आरोपीला पकडण्यासाठी बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सिंदखेडराजा तालुक्यातील लोणी लव्हाळा येथे गेले होते. दरम्यान, गावातील आरोपीच्या नातेवाइकांनी पोलिसांना पाहताच त्यांच्यावर हल्ला चढविला. यात पथकातील चार पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.

हे वाचा - जुने दर, नवे क्षेत्रफळ
आरोपी झाला पसार

बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक शुक्रवारी (ता.24) घरफोडी व चोरीच्या प्रकरणात असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी लोणी लव्हाळा गावात गेले असता आरोपीची पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पारध्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. परंतु, या झटापटीत आरोपी पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला.


क्लिक करा - सरोळी पीर येथील शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा
लाठी अन् दगडफेक

आरोपी जखमेश्वर शेनफळ शिंदे हा साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील ग्राम लोणी लव्हाळा येथे आलेला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक श्री. आढाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे, पोहेकॉ सुधाकर काळे, सय्यद हारून, संजय नागवे, मपोका अनुराधा उबरहंडे व चालक रवींद्र भिसे हे लोणी लव्हाळा येथे सकाळी 8 वाजेच्या सुमारास पोचले. आरोपी जखमेश्वर शिंदे हा पोलिसांना पाहून पळाला. त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले असता अचानक आरोपीचे नातेवाइकांनी पोलिस पथकावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत दगडफेक केली.


यापूर्वीही झाला हल्ला
यावेळी उकळता चहा देखील पोहेकॉ सुधाकर काळे यांच्या अंगावर फेकला. या झटापटीत आरोपी जखमेश्वर हा हातातून पळून जाण्यास यशस्वी झाला. या प्राणघातक हल्ल्यात विजय मोरे, सुधाकर काळे, आढाव, संजय नागवे जखमी झाले आहे. या प्रकरणी स्था.गु.शा.चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय मोरे यांच्या फिर्यादीवरून साखरखेर्डा पोलिस ठाण्यात आरोपी जखमेश्वर शिंदे, शेनफळ शिंदे, रवी ऊफ बबल्या, शिवगंगा शिंदे, आरती, वैशाली, सुनीता भोसले व इतर अनोळखी तीन पुरुष, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संग्राम पाटील करीत आहे. यापूर्वी सुद्धा गावात पारध्यांनी पोलिस पथकावर हल्ले केला होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com