अकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू 

accident
accident

बाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा दरम्यान अंबुजा फॅक्टरी जवळ घडली. 

अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळा वरुन पळून गेले असून बाळापूर पोलिसांकडून त्या वाहनाचा शोध सुरू आहे. दरम्यान दोन्ही बापलेकांच्या मृतदेहांना अकोला सर्वोपचार रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे. 

आज रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास कान्हेरी (गवळी) येथील भाष्कर बोरकर व त्याचे वडील ज्ञानेश्वर बोरकर हे बापलेक कान्हेरी येथून अकोल्याकडे विना क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. दरम्यान त्यांची दुचाकी राष्ट्रीय महामार्गावरील अंबुजा फॅक्टरी जवळ पोचताच समोरुन भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे या दोन्ही बापलेकांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. त्यानंतर अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

सदर मृत देह अकोला सर्वोपचार रुग्णालय येथे रवाना केले तसेच अपघातग्रस्त दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली पुढील तपास पो स्टे बाळापूर करीत असून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, जयवंत शिंदे व गिरीश वीर हे पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत. अपघातामुळे कान्हेरी गवळी गावावर शोककळा पसरली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com