75 वर्षीय बापाने केला दारूड्या मुलाचा खून

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 18 जुलै 2019

-  दारूड्या मुलाकडून वृद्ध आईवडीलांना होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळून वृद्ध बापाने झोपेत असलेल्या मुलाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला.

- मनाला हेलावून सोडणारी ही घटना आज गुरूवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.

नागपूर : दारूड्या मुलाकडून वृद्ध आईवडीलांना होणाऱ्या रोजच्या मारहाणीला कंटाळून वृद्ध बापाने झोपेत असलेल्या मुलाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. मनाला हेलावून सोडणारी ही घटना आज गुरूवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

संजय दामोदर बाळापूरे (वय 40, रा. अलंकार नगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दामोदर नागोराव बाळापुरे (वय 75) असे आरोपी पित्याचे नाव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father killed his addicted son