का केली असेल जन्मदात्या बापाने मुलाची हत्या ?

apoti hatya
apoti hatya

बोरगाव मंजू : येथून जवळच असलेल्या आपोती येथे किरकोळ आर्थिक कारणावरून वाद होऊन बापाने मुलास कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत मुलाचा सचिन भीमराव पळसपगार (वय 26) मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.17) रात्री घडली. दरम्यान, शनिवारी (ता.18) घटनेची फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी मृतकाच्या वडिलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचा - वृत्तपत्र घेऊन जाणाऱ्या टॅक्सीचा अपघात
पैशाच्या कारणावरून झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपोती येथील रहिवासी सचिन भीमराव पळसपगार (वय 26) याने गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवून आणण्यासाठी वडील भीमराव रंगराव पळसपगार यांना 15 हजार रुपये मागितले. या कारणावरून दोघात चांगलाच वाद निर्माण झाला. रागाच्या भरात वडिलाने मुलाला कुऱ्हाडीने मारहाण केली. त्यातच मुलगा गंभीर जखमी झाला.

क्लिक करा - सावधान...बनावट नोटा चलनात आल्या
उपचाराआधीच झाला मृत्यू

दरम्यान, जखम अवस्थेत असलेल्या सचिनला येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरानी सचिनला मृत घोषित केले. घटनेची फिर्याद बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात दिल्यावरून भीमराव पळसपगार यांच्या विरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अटनेची माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी डाॅ. अर्जुन भोसले, ठाणेदार हरिश गवळी, पोलिस उपनिरीक्षक संतोष अघाव घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीसह घटनेत वापरल्या गेलेले हत्यार जप्त केले आहे. पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com