आंबटशौकीन चालकामुळे बापलेक पोलिसांच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नागपूर - मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये इमारत कोसळून सात जणांचे बळी गेल्याप्रकरणात फरार असलेले बापलेक आंबटशौकीन चालकामुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास गंगाजमुना परिसरात उघडकीस आली. महेश खेमतानी आणि आकाश खेमतानी अशी अटक केलेल्या बिल्डर बापलेकाची नावे आहेत. 

नागपूर - मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये इमारत कोसळून सात जणांचे बळी गेल्याप्रकरणात फरार असलेले बापलेक आंबटशौकीन चालकामुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडले. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास गंगाजमुना परिसरात उघडकीस आली. महेश खेमतानी आणि आकाश खेमतानी अशी अटक केलेल्या बिल्डर बापलेकाची नावे आहेत. 

शुक्रवारी रात्री आठला गंगाजमुना रोडवर वाहतूक पोलिस नाकाबंदी करीत होते. त्यावेळी एक मद्यधुंद कारचालक गंगाजमुनात गेला होता. त्याच्याकडे बरीच मोठी रक्‍कम होती आणि मौजमजेसाठी तो तासाभरापासून गंगाजमुनात रेंगाळत होता. शेवटी तो कार घेऊन परत निघाला. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. निर्मलसिंग मनजितसिंग जट (जबलपूर) असे त्याने नाव सांगितले. त्याची विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. वर्धा रोडवरील पॉश हॉटेलमध्ये मुक्‍कामी असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना संशय आला. त्याला खाक्‍या दाखवताच त्याने आरोपी बिल्डर बापलेकाबाबत माहिती दिली. जबलपूरच्या खेमतानी बिल्डर्सची कार असल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांनी चालकावर लकडगंज पोलिस ठाण्यात नेऊन "डीडी' कारवाई केली. तर पोलिसांच्या एका पथकाने महेश आणि आकाश खेमतानी हे बापलेक थांबलेल्या हॉटेलवर छापा घातला. दोघांनाही ताब्यात घेतले. जबलपूरचे आरोपी असल्याची खात्री होताच त्यांनी जबलपूर पोलिसांना फोन केला. शनिवारी जबलपूर पोलिस नागपुरात आले. त्यांनी बापलेकांना ताब्यात घेतले आणि जबलपूरला रवाना झाले. 

बापलेकांवर दहा हजारांचे बक्षीस 
बिल्डर महेश खेमतानी याने "मालहोम क्‍यू' नावाने दहा मजली इमारत जबलपूरला बांधली. कच्चे बांधकाम केल्यामुळे ती इमारत खाली कोसळली. या अपघातात सात जण ठार झाले. या प्रकरणी तिलवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून दोघेही बापलेक महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, काश्‍मीर, दिल्ली अशा राज्यांत फिरत होते. त्यांच्यावर जबलपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दहा हजार रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. 

Web Title: father & son arrested in nagpur