फादर्स डे विशेष; सकाळ सर्व्हेक्षणात तरूणाईचे मत

विवेक मेतकर
रविवार, 17 जून 2018

वडील नेहमी आपल्याला सतत साथ देत राहतात. म्हणून आपणही काहीतरी वडिलांना दिले पाहिजे, असे मत अनेकांनी प्रामाणिकपणे नोंदविले.

अकोला - माझे फादर माझ्यासाठी गॉड असल्याची प्रतिक्रीया बहूतांश तरूण-तरुणींनी 'सकाळ'च्या वतीने फादर्स डे निमित्त केलेल्या सर्व्हेक्षणात व्यक्त केल्या. खरं तर वडिलांबद्दलची कृतज्ञता एका दिवसात व्यक्त करताच येणारी नाही.

1) कोणत्याही गोष्टीची निवड करण्यापूर्वी तुम्ही वडिलांशी संवाद साधता का?

 • होय 72.9 टक्के 
 • नाही 14.6 टक्के 
 • सांगता येत नाही 10.4 टक्के

2) एखादा निर्णय घेताना वडील चुकले तर ती चूक तुम्ही वडिलांच्या निदर्शनास आणून देता का?

 • होय 56.3 टक्के
 • नाही 21.1 टक्के
 • सांगता येत नाही 14.6 टक्के
 • असं कधी होत नाही 2.1 टक्के

3) वडिलांनी तुमचा एखादा निर्णय मान्य केला नाही तर काय करता?

 • या प्रश्‍नावर चर्चा करून मुद्दा पटवून देतो 67.4 टक्के 
 • न सांगता परस्पर निर्णय घेतो 10.9 टक्के
 • परिस्थितीनुसार निर्णय घेतो 2.2 टक्के
 • दुर्लक्ष करतो 6.5 टक्के

4) वडिलांसाठी काय करावेसे वाटते?

 • शक्‍य त्या प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत करायला आवडेल 45.8 टक्के 
 • म्हातारपणात त्यांना आधार बनणे 20.8 टक्के
 • खूप शिकावेसे वाटते 12.6 टक्के
 • काहीतरी वेगळे करता येईल 16.7 टक्के

5) आपण स्वत: बनविलेली एखादी वस्तू वडिलांना गिफ्ट केली आहे का?   

 • होय 56.3 टक्के
 • नाही 46.8 टक्के

6 ) वडिलांच्या भावनांचा तुम्ही कधी विचार करता का?

 • होय 97.9 टक्के
 • नाही 2.1 टक्के

काहीतरी देण्याची भूमिका -
वडिलांचा प्रभाव हा जीवनावर असला तरी वडिलांविषयी एखाद्याच्या मनात वेगवेगळी प्रतिमा असू शकते. वडिलांची कोणती गोष्ट आवडते, या प्रश्‍नातून वागणूक, मित्राची भूमिका, आधार, आदर असे अनेक घटक पुढे आले. काही झाले तरी वडिलांविषयी आदरयुक्त भीती ही प्रत्येकाच्या मनात असतेच. म्हणूनच सर्वेक्षणादरम्यान अनेक चांगल्या गोष्टीही पुढे आल्या. आयुष्यात निर्णयाला फार महत्त्व असते. बरोबर ठरला तर आयुष्य घडते अन्‌ चुकला तर मात्र परिणाम भोगावे लागतात, यासाठी वडिलांनी तुमचा एखादा निर्णय मान्य केला नाही, या प्रश्‍नावर मुद्दा पटवून देतो, असं सांगणाऱ्यांची टक्केवारी ही जास्त होती. वडील नेहमी आपल्याला सतत साथ देत राहतात. म्हणून आपणही काहीतरी वडिलांना दिले पाहिजे, असे मत अनेकांनी प्रामाणिकपणे नोंदविले. कुटुंब व्यवस्था टिकून राहावी, असे प्रत्येकाला वाटते. वडील तर कुटुंबाचा कणा असतो. तो ही एक माणूस असतो. म्हणून कुटुंब व्यवस्थेत अजूनही चांगुलपणा टिकून आहे, हे सिद्ध झाले.

Web Title: fathers day special sakal survey

टॅग्स