वडिलांचा परवाना, मुलाने झाडली गोळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

नागपूर : वडिलांच्या बंदुकीच्या परवान्यावर मुलाने गोळी झाडून अवनी वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे शिकारी असगर अली अडचणीत येणार असून त्याच्याविरुद्ध कठोर करवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नागपूर : वडिलांच्या बंदुकीच्या परवान्यावर मुलाने गोळी झाडून अवनी वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे शिकारी असगर अली अडचणीत येणार असून त्याच्याविरुद्ध कठोर करवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
एनटीसीएच्या अहवालात शफाअत अली खान याचा मुलगा असगर अली याच्याकडे बंदुकीचा परवाना नसल्याचा ठपका एनटीसीएच्या तीन सदस्यांच्या समितीने ठेवला आहे. असगर अली याने आपल्याकडे बंदुकीचा परवाना असल्याचा दावा राज्य सरकारकडे केला आहे. तेलंगणा निवडणुकीनंतर परवाना सादर करण्याची मुदतही असगर अली याने मागितली आहे. त्यामुळे तेलंगणा येथील मतमोजणीनंतर त्याबद्दलचा खुलासा समोर येणार आहे. परिणामी, पुढील आठवड्यात गुरुवार अथवा शुक्रवारी आपला परवाना सरकारला द्यावा लागणार आहे. परवाना सादर न केल्यास सरकारने असगर अलीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अवनी वाघिणीला मारण्यासाठी शफाअत अली खानची नियुक्ती करण्यात आली होती. त्या दिवसापासूनच या मोहिमेला वेगळे वळण लागले होते. त्याच्या नियुक्तीसाठी मुंबईतून दबाव टाकण्यात आल्याची चर्चाही दबक्‍या आवाजात सुरू होती. वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करणे आणि ठार मारण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. इटालियन कुत्रे, ग्लायडर, महागडे परफ्युम, हत्ती आणि वाघिणीचे मूत्र शिंपडण्याचे प्रयोग करण्यात आले. मात्र, सर्वच प्रयत्न अपयशी ठरले होते. दरम्यान, शफाअत अली खान बाहेरगावी असताना त्याचा मुलगा असगर अली खानने मोहिमेची सूत्रे हातात घेतली. अवनी वाघिणीची दोन नोव्हेंबरला रात्री शिकार केली. वाघिणीच्या शिकारीनंतर राज्यभरातून वाद-प्रतिवाद सुरू झाले. राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आरोपही झाले. त्यामुळेच एनटीसीएने चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली होती. समितीने वनकायदा, शस्त्रकायद्याचे उल्लंघन केले असगर अलीची नियुक्ती या कामासाठी केली नव्हती असा स्पष्ट उल्लेख अहवालात केला आहे. त्यामुळे आता असगर अली आरोपीच्या पिंजऱ्यात उभा ठाकला आहे.

Web Title: Father's license, son shoot shot

टॅग्स