esakal | चिंताजनक : कोरोनाच्या भीतीने माणुसकीतील दुफळी वाढतेय; चेकपोस्ट ऐवजी असा केला जातोय रस्ता बंद
sakal

बोलून बातमी शोधा

RISOD.jpeg

कोरोना विषाणू संदर्भात प्रशासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने संबंधित शेनगांव -रिसोड प्रशासनाने चिंचाबाभर ते केलसुला सरहद्दीवर चेकपोस्ट लावणे अनिवार्य होते.

चिंताजनक : कोरोनाच्या भीतीने माणुसकीतील दुफळी वाढतेय; चेकपोस्ट ऐवजी असा केला जातोय रस्ता बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड (जि.वाशीम) : विदर्भ-मराठवाडा सिमा रिसोड तालुक्याला लागून आहेत. बहुधा मराठवाड्यातील केलसुला, साखरा, उटी, हत्ता, सेनगांव, सुलदली, वटकळी, सावरखेडा, कहाकर, वेलतुरा, पानकन्हेरगांवासह अनेक गावांना बाजारपेठ ही रिसोडची आहे.

परंतु कोरोणा विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन घोषित केले आणि चिंचाबाभर - केलसुला हा राज्यमार्ग काही ग्रामस्थांनी रस्त्यावर मुरूम, झाडे तोडून पूर्णपणे बंद केल्याने अत्यावश्यक सेवा सुद्धा या परिसरातील ग्रामस्थांना दुरापास्त झाल्याने अनेक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

आवश्यक वाचा - चिंताजनक! या जिल्ह्याच्या कोरोनामुक्तीच्या आनंदावर काही तासातच विरजन

कोरोना विषाणू संदर्भात प्रशासनाने लॉकडाऊन घोषित केल्याने संबंधित शेनगांव -रिसोड प्रशासनाने चिंचाबाभर ते केलसुला सरहद्दीवर चेकपोस्ट लावणे अनिवार्य होते. परंतु प्रशासनाने केवळ मोक्क्याच्या स्थळी चेकपोस्ट लावले. परंतु मराठवाडा - विदर्भाची चिंचाबाभर ते केलसुला मार्ग मोकळाच होता. कोरोणाचा कहर देशात वाढत असतांना आणि कोरोणा संसर्गाची तिसर्‍या टप्प्याकडे वाटचाल होत असतांना अनेक ग्रामस्थ मुंबई पुणे औरंगाबाद सारख्या औद्योगिक शहरामधुन स्वगृही परतीच्या मार्गावर असल्याने अनेक गावातील ग्रामस्थांनी ‘हम करे सो कायदा’ अवलंबल्याने थेट राज्यमार्गच अवैधरित्या बंद केला. 

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे वेतन लाॅक, तीन हजारावर शिक्षक वेतनाविना

यामुळे अनेक खेडेगावातील ग्रामस्थांना जिवंतपणीच मरण यातना भोगाव्या लागत आहेत. सदर रस्त्यावर  प्रशासनाने तातडीने शासकीय चेकपोस्ट लावून अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्ण किंवा इतर कुठलीही अत्यावश्यक सेवा शासनाच्या नियमानुसार देण्याची मागणी मराठवाड्यातील केलसुला, साखरा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आशा प्रकारच्या विकृतपणे रस्ता अडविल्याने कोरोना विषाणूंच्या भीतीने माणसा - मानसातील अंतराची दरी वाढत आहे. संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे तत्काळ लक्ष देत योग्य तो चेकपोस्ट लावण्याची मागणी जोर धरत आहे.