तुम्ही प्लीज दारू सोडा..!  असे लिहून पत्नीची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

नागपूर-  "तुम्ही प्लीज दारू पिणे सोडून द्या... दारूपायी आपला संसार वाया गेला... सोन्यासारख्या मुलाचे भविष्य बर्बाद झाले... मी तर जग सोडून जात आहे... तुमच्या दारूच्या सवयीमुळे आपल्यावर खूप कर्ज झालंय... परंतु, तुम्ही दारू सोडा... आणि आपल्या एकुलत्या मुलाचा सांभाळ करा...' असे लिहून पत्नीने धंतोली बगीच्यातील शौचालयात विष पिऊन आत्महत्या केली. केवळ पतीच्या दारूच्या व्यसनापोटी आज हसता-खेळता संसार उद्‌ध्वस्त झाल्याची सत्यस्थिती समोर आली. भारती रूपेश ठाकरे (वय 30, रा. बाबुलखेडा, अजनी) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूपेश ठाकरे हे खासगी व्यवसाय करतात. "घरात हातावर कमावणे आणि पानावर खाणे' अशी आर्थिक स्थिती असताना त्यांना दारूची सवय लागली. राजरोसपणे दारू पिऊन घरात येण्यामुळे आर्थिक स्थिती बिघडली. संसार चालविण्यासाठी अनेकांकडून कर्जही घेतले. एकुलता एक असलेला 10 वर्षांच्या मुलाचा शिक्षणाचा खर्चही झेपेनासा झाला होता. अशातच भारती यांना आर्थिक चणचण आणि कर्जदारांचे टोचून बोलण्याचा दुहेरी मार बसत होता. त्यामुळे भारती यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. आज सकाळच्या सुमारास भारती यांनी कपड्याची बॅग भरली. धंतोली गार्डनमध्ये आल्या. शौचालयात जाऊन विषाच्या दोन बाटल्या गटकल्या. तासाभरात त्यांचा मृत्यू झाला. कुणीतरी महिला शौचालयाला जात असताना दरवाज्यात भारती यांचा मृतदेह दिसला. तिने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे घटनास्थळावर पोहोचले. मृतदेह मेडिकलमध्ये पाठविण्यात आला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

मुलाच्या वहीत सुसाइड नोट 
भारती यांचा मुलगा यावर्षी पाचवीत आहे. नुकताच शाळा सुरू झाल्यामुळे त्याला पुस्तके आणि वह्या घेतल्या होत्या. त्यातीलच एक वही भारती यांनी सुसाइड नोट लिहिण्यासाठी घेतली. ती वही शौचालयातून पोलिसांनी जप्त केली.

Web Title: Fed Up With Husband's Drinking Habit wife commits suicide