रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

घुग्घुस (जि. चंद्रपूर) : गोकुलनगरातील एका महिलेस प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिका बोलविली. राजीवरतन रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचली. मात्र, प्रसूत महिलेस खाली उतरणेही शक्‍य नाही. त्यामुळे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णवाहिकेतच प्रसूती करावी लागली. बाळ आणि महिला दोघांचीही प्रकृती ठीक आहे.

वणी येथील गोकुलनगरात वर्षा संजय भोयर राहते. दोन दिवसांपूर्वी तिला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यामुळे घरच्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलाविली. तिला घुग्घुस येथील राजीवरतन रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालय येताच वर्षाला जास्तच त्रास होऊ लागला होता. खाली उतरणेही कठीण झाले होते.
त्याचवेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा सोंडवले तिथे आल्या. महिलेची प्रकृती नाजूक होती. तिला खाली उतरविणे धोक्‍याचे होते. त्यामुळे डॉ. सोंडवले यांनी परिचारिका रजनी पाझारे, सहकारी कल्पना यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतच वर्षाची प्रसूती केली.
बाळ, महिलेची प्रकृती आता ठीक असल्याचे डॉ. सोंडवले यांनी सांगितले. दरम्यान, चांगली कामगिरी बजावल्याबद्दल 15 ऑगस्ट रोजी सीएमडी राजीव रंजन मिश्र यांच्या हस्ते डॉ. सोंडवले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female delivery in the ambulance