इर्विनमध्ये प्रशिक्षणादरम्यान महिला डॉक्‍टरचा मृत्यू

file photo
file photo

अमरावती : आरोग्यवर्धिनी या प्रकल्पासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झालेल्या महिला डॉक्‍टरचा प्रशिक्षणादरम्यान सोमवारी (ता. 19) मृत्यू झाला. सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
डॉ. ज्योत्स्ना राजू पवार (वय 43 रा. श्रीकृष्णपेठ, मोर्शी) असे मृत डॉक्‍टरचे नाव आहे. सोमवारी (ता. 19) प्रशिक्षणाचा पहिलाच दिवस होता. आल्यानंतर इर्विनमध्ये जमिनीवर कोसळल्या, तपासणीअंती डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com