पोलिस-नक्षल चकमकीत महिला नक्षलवादी ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

गडचिरोली : नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान सोमवारी (ता. 29) सकाळी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान पोटेगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत फुसेर-गरंजी जंगल परिसरात पोलिसांशी झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी ठार झाली. 28 जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे.

या सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया होऊ नये म्हणून सर्वत्र नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. असेच अभियान पोलिस व सी-60 पथकाचे जवान राबवीत असताना सोमवारी गरंजी गावानजीकच्या जंगलात नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले. घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तो मृतदेह, तसेच एक 12 बोअरची बंदूक, 13 पिट्टू व अन्य साहित्य जप्त केले. घटनास्थळ परिसरात अजूनही अभियान सुरूच आहे. चार ते पाच नक्षलवादी जखमी असल्याची शक्‍यता पोलिस विभागाने व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female Naxalite killed in police-Naxal encounter