महिला पोलिस कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नागपूर, ता. 2 ः अजनी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी पळाल्याच्या प्रकरणात महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशीही सुरू करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. वनिता जुनघरे असे निलंबित करण्यात आलेल्या माहिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. निखिल चैतराम नंदनकर (27, भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळ) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल नंदनकर या आरोपीने 2 जून 2019 रोजी दुपारी एका 16 वर्षीय मुलीचे घरातून अपहरण केले होते.

नागपूर, ता. 2 ः अजनी पोलिस ठाण्याच्या लॉकअपमधून अपहरण आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी पळाल्याच्या प्रकरणात महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशीही सुरू करण्यात आली असून दोषी आढळणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. वनिता जुनघरे असे निलंबित करण्यात आलेल्या माहिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. निखिल चैतराम नंदनकर (27, भांडेवाडी रेल्वेस्थानकाजवळ) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल नंदनकर या आरोपीने 2 जून 2019 रोजी दुपारी एका 16 वर्षीय मुलीचे घरातून अपहरण केले होते. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तब्बल 15 दिवस बलात्कार केला होता. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपी निखिल याला शोधण्यात अजनी पोलिसांना अपयश आले होते. आरोपी पकडण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किंवा उपनिरीक्षकांनी विशेष प्रयत्नही केले नव्हते. पाचपावली ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक बोंडे यांच्याकडे तपास आला. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग आला. पीएसआय बोंडे यांनी मोठी मेहनत घेऊन आरोपी निखिलला 31 जुलै रोजी सापळा रचून अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, तेथेच घोळ झाला. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त कारभार सुरू असलेल्या अजनी पोलिसांचा निष्काळजीपणा एका महिला पोलिसाच्या नोकरीवर बेतला. एनपीसी वनिता जुनघरे यांची लॉकअप गार्ड ड्यूटी होती. मात्र, त्या स्वच्छतागृहात गेल्या असताना आरोपी पोलिस ठाण्यात उपस्थित 40 पेक्षा जास्त पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेला.लॉकअपमधून आरोपी पळून जाण्याच्या घटनेला तीन दिवस झाले असून अद्याप आरोपीला पकडण्यात अजनी पोलिसांना यश आले नाही. अजनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाल्यामुळे आता आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेने कंबर कसली आहे. गुन्हे शाखेचे एक पथक आरोपीचा शोध घेत आहे.पोलिस निरीक्षकांच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहण्यासाठी टीव्ही लावलेला असतो. एक सीसीटीव्ही कॅमेरा लॉकअपवरही ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पीआयच्या चेम्बरमधील टीव्हीत आरोपी पळून जात असल्याचे दिसत होते. त्यानंतर लॉकअप रिकामेसुद्धा दिसत होते, तरीही आरोपी पळून गेल्याची बाब पीआयच्या कशी लक्षात आली नाही, अशी चर्चा अजनी ठाण्यात आहे.
लॉकअपमधून आरोपी पळून जाण्याची घटना गंभीर आहे. या प्रकरणात एका महिला पोलिस शिपायाला निलंबित केले आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. चौकशीअंती दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. -राजतिलक रौशन, पोलिस उपायुक्‍त.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Female police personnel suspended