मैदान कराटेचे; खेळ अस्वच्छतेचा

वागदरा : स्थानिक ग्रामपंचायतद्वारा मैदान परिसरात टाकण्यात येत असलेला कचरा.
वागदरा : स्थानिक ग्रामपंचायतद्वारा मैदान परिसरात टाकण्यात येत असलेला कचरा.

गुमगाव (जि. नागपूर) : शाळकरी मुलांपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू व कराटेपटूंपर्यंत सगळ्यांच्या हक्काचे ठिकाण म्हणजे वागदरा येथील "कराटे ग्राउंड'. मात्र, वागदरा ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे मैदानात अस्वच्छेतचा "खेळ' सुरू आहे.
हिंगणा तालुक्‍यातील महत्त्वाच्या गावांमध्ये गणना होणाऱ्या आदर्श सांसद ग्राम वागदरा या गावामध्ये नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी उपलब्ध असलेल्या ठिकाणांमध्ये कराटे ग्राउंडचे नाव आवर्जून घेतले जाते. परंतु, वागदरा ग्रामपंचायतद्वारा गावातून जमा केलेला कचरा मैदानाच्या परिसरात असलेल्या देवी मंदिराच्या पाठीमागे टाकण्यात येत असल्याने लवकरच मैदानाला "डम्पिंग ग्राउंड'चे स्वरूप येण्याची भीती निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे मैदानामध्ये खेळणे, सराव करणे, देवदर्शन करणे तसेच मॉर्निंग वॉक करणे जिकरीचे ठरत आहे. मैदान परिसरात कचऱ्याची दुर्गंधी येत आहे, तसेच डुकरांचा आणि मोकाट जनावरांचा त्रास खेळाडूंना सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com