पुरात अडकून पंधरा जनावरे ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

धाबा (जि. चंद्रपूर) : नाल्याला आलेल्या पुरात गुराढोरांचा कळप सापडला. यात जवळपास पंधरा जनावरे वाहून गेलीत. वाहून गेलेली सात मृत जनावरे सापडली आहेत. उर्वरित जनावरांचा शोध सुरू आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्‍यातील सोमनपल्ली येथे बुधवारी (ता. 7) सहा वाजताच्या सुमारास घडली.

गोंडपिपरी तालुक्‍यात दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे सोमनपल्ली-धाबा मार्गावरील मोठा नाला दुथळी भरून वाहत आहे. दरम्यान, गावाकडे निघालेला जनावरांचा कळप नाल्याला आलेल्या पुरात सापडला. यात जवळपास पंधरा जनावरे वाहून गेलीत. वाहून गेलेल्या पैकी सात जनावरे कोंढाणा-सोमणपल्ली मार्गातील पडक्‍या पुलात अडकून होती. पूर ओसल्यामुळे मृत जनावरे दिसली. दरम्यान, नागरिकांनी मृत जनावरे बाहेर काढली असून बेपत्ता जनावरांचा शोध सुरू आहे. सापडलेली जनावरे दिवाकर बोरकुटे, मंजुळा नागपुरे, सुधाकर ठाकूर, राजू भोयर, कुबडे, मोरेश्‍वर ठोंबरे यांच्या मालकीची आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fifteen animals were killed in the flood