पाच वर्षांत पंधराशे कुमारी माता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - गेल्या पाच वर्षांत पंधराचे कुमारी मातांची नोंदणी महानगरपालिकांच्या  रुग्णालयात झाली असून, यातील ३ महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकाराअंतर्गत समोर आली आहे. खासगी आणि इतर शासकीय रुग्णालयांचा विचार केल्यास हा आकडा किती पटीने जास्त असण्याची शक्‍यता आहे.

विदेशी संस्कृतीप्रमाणे आपल्याकडे विवाहपूर्वीच शारीरिक संबंधाचे प्रमाण वाढत आहेत. भारतीय संस्कृतीत विवाहपूर्व गर्भधारणा हे अनैतिक समजण्यात येते. अशा मुलींकडे समाजाचा दृष्टिकोनही वेगळाच असतो. मात्र, अलीकडच्या काही वर्षात मुलामुलींमधील विवाहपूर्वीची जवळीकता वाढू लागल्याचे चित्र आहे. विवाहपूर्वीच गर्भधारणा झाल्याने बाळंतपण व गर्भपातासाठी १५०१  कुमारी मातांची नोंदणी झाली. सर्वाधिक नोंदणी ४७२ मातांची नोंदणी २०१३-१४ मध्ये असून, वर्ष २०१६-१७ मध्ये २५६ मातांची नोंदणी झाली. ही माहिती समाजसेवक अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकाराअंतर्गत मिळाली. गेल्या चार वर्षांत तीन कुमारी मातांचा मृत्यू झाला असून, यात १ माता ही १८ वर्षांखालील होती. यातील एकही बाळाचा मृत्यू झाला नाही.

Web Title: Fifteen female mothers in five years