पंधरा हजार विद्यार्थी देणार ज्ञान-विज्ञान परीक्षा

Fifteen thousand students will take the Knowledge Science exam
Fifteen thousand students will take the Knowledge Science exam

अकाेला : विद्यार्थ्यांना विज्ञानात अधिक रस घेण्यास उद्युक्त करून त्यांच्यात निरीक्षण, वर्गीकरण, अनुमान या त्रिसूत्रातून वैज्ञानिक दृष्टिकाेन तयार व्हावा, या उद्देशाने शनिवारी (ता.८) ज्ञान विज्ञान परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा जिल्ह्यातील १७६ केंद्रावर हाेणार आहे. परीक्षेसाठी पंधरा हजार विद्यार्थी बसणार आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व तालुकानिहाय अध्यापक मंडळातर्फे ज्ञान विज्ञान परीक्षेचे आयाेजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११ या कालावधीत परीक्षा हाेणार आहे. परीक्षेच्या माध्यमातून विज्ञान विषयातील संकल्पना आणि शाेध यांचा जीवनाशी असणारा संबंध विद्यार्थ्यांना कितपत समजला आहे, याचे आकलन करण्यात येईल.

इयत्ता पाचवी ते सातवी ‘अ’गट, इयत्ता आठवी ते दहावी ‘ब’ गट अशा दाेन गटात ही परीक्षा घेतली जाईल. ५० गुणांच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचरण्यात येतील. प्रश्न पाठ्यपुस्तक, परिसरातील घटना, सामान्य ज्ञानावर आधारीत राहतील. विद्यार्थ्यांना ‘आेएमआर’उत्तर पत्रिका दिली जाणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ पदाधिकारी भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेतच परीक्षेला उपस्थिती राहावे, असे आवाहन जिल्हा ज्ञान विज्ञान परीक्षा आयाेजन समितीने केले आहे.

तालुका निहाय परीक्षा केंद्र व विद्यार्थी
तालुका केंद्र विद्यार्थी
अकाेला
(शहर) ३३ ३८४७
अकाेला
(ग्रामीण) १३ ९९३
पातूर २८ २१४९
तेल्हारा १९ २११४
बार्शिटाकळी २१ १४०८
बाळापूर १५ १५४५
मुर्तिजापूर २५ १४७७
अकाेट २२ १३८१

१२० विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर

परीक्षेत प्रत्येक तालुक्यातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या ४० विद्यार्थी असे जिल्ह्यातून १२० विद्यार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर करण्यात येईल. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर परीक्षा घेतली जाईल. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड विज्ञान कार्यशाळेसाठी करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com