एलायस गोंसाल्वेस नागपूरचे पाचवे आर्चबिशप

आर्चबिशप
आर्चबिशप

नागपूर : बिशप एलायस गोंसाल्वेस यांची नागपूरचे पाचवे आर्चबिशप म्हणून नियुक्ती झाली असून रविवारी (ता. 27) एसएफएस कथिड्रल येथे त्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित केला आहे. यापूर्वी ते अमरावती येथील बिशप म्हणून कार्यरत होते, अशी माहिती महाधर्मप्रांताचे प्रशासक फादर जरोम पिंटो यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फादर रिचो उपस्थित होते.
मुंबई आर्चडियोसचे प्रमुख कार्डिनल ओसवाल्ड ग्रासियास आर्चबिशप हे या पदग्रहण सोहळ्याचे मुख्य अतिथी राहणार आहेत. यानंतर सामूहिक प्रार्थना होणार आहे. ज्यामध्ये नवीन आर्चबिशप अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात एलायस गोंसाल्वेस यांना कथिड्रल स्थित आर्चबिशपच्या खुर्चीवर समारोहपूर्वक बसविले जाणार आहे. यानंतर एलायस गोंसाल्वेस हे आर्चबिशप म्हणून आपले कामकाज पाहतील. नागपूरचे आर्चबिशप विरुथकुलुंगरा यांचे 19 एप्रिल 2018 मध्ये निधन झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. सध्या प्रशासक म्हणून जरोम पिंटो यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता या पदाची जबाबदारी एलायस गोंसाल्वेस यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. बिशप एलायस यांनी एप्रिल 1990 मध्ये वसई येथे आर्चडियोस ऑफ बॉम्बेमध्ये पहिले पादरी म्हणून जबाबदारी सांभाळली. 11 जुलै 2012 पासून अमरावती येथे बिशप म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आता बिशप एलायस यांच्याकडे आर्चबिशप पदाचा कार्यभार दिला जाणार आहे. याशिवाय संपूर्ण देशातील बिशप आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला त्यांचा परिवारही उपस्थित राहणार आहे. यावेळी फादर रिचो उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com