कॉलेजमध्ये जाण्याकरिता पन्नास विद्यार्थी बारा किलोमीटर चालले!

संदीप रायपुरे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही मग काय ती थेट बसस्थानकात पोहोचली. आपली आपबिती सांगत त्यांनी हल्लाबोल केला. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली मार्गावर आज सकाळी प्रशासनाची व लोकप्रतिनीधींची पुरती पोल करणारा संतापदायक प्रकार घडला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - रेतीमाफीयांच्या ओव्हरलोड वाहतूकीने मार्गाची पुरती वाट लागली. एसटी मंडळाने बस वळती केली. अन् मग कॉलेजमध्ये जाण्यासाणी पन्नास मुल मुली पायदळच निघाली. खराब मार्ग, जंगल, असा बारा किलोमीटरचा प्रवास केला. कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही मग काय ती थेट बसस्थानकात पोहोचली. आपली आपबिती सांगत त्यांनी हल्लाबोल केला. गोंडपिपरी तालुक्यातील वढोली मार्गावर आज सकाळी प्रशासनाची व लोकप्रतिनीधींची पुरती पोल करणारा संतापदायक प्रकार घडला.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हा आदिवासी बहूल व दुर्गम तालुका. तालुक्यातील अनेक गावात मार्गाची खस्ता हालत आहे. अनेक गावात बसेस जात नाही. दळणवळणाची मुबलक साधणेही नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना  सामान्य जिवन जगणे कठीण होत आहे. आता तर याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.

तालुक्यातील चेकलिखीतवाता, वढोली येथील पन्नासहून अधिक मुल, मुली गोंडपिपरी येथे अकरावीत शिकतात. चेकलिखीतवाडा ते वढोली हे पाच किलोमीटर अंतर पायदळ कापायचे, अन् वढोलीवरून बसने गोंडपिपरीला जायचे. असा त्यांचा नित्यक्रम. विठ्ठलवाडा व्हाया वढोली ते गोंडपिपरी ही त्यांची ठरलेली बस. पण रेतीमाफीयांच्या ओव्हरलोड वाहतुकीने या मार्गाची पुरती वाट लागली. अन् विठ्ठलवाड्यावरून वढोलीला न जाता बस परस्पर गोंडपिपरीला येऊ लागली.

नेहमीप्रमाणे आज चेकलिखीतवाडा, वढोली येथील पन्नासहून अधिक मुल, मुली गोंडपिपरीला कॉलेजला जाण्याकरिता निघाली. बस काही आली नाही. बस परस्पर गोंडपिपरीला गेल्याची माहिती त्यांना मिळाली. अन् मग त्यांनी पायीच प्रवास करण्याचा निर्णय घेतला. लिखीतवाडा ते वढोली असा पाच किलोमीटर पायी प्रवास केल्यानंतर वढोली ते गोंडपिपरी हा सात असा एकूण बारा किलोमीटरचा खराब, जंगलाचा मार्ग त्यांनी चालून काढला. गोंडपिपरीला पोहचले. कॉलेजला उशिर झाल्याने तिथे न जाताही मंडळी बसस्थानकात पोहोचली. येथील नियंत्रकांना जाब विचारत विद्यार्थ्यांनी हल्लाबोल केला.


बराच वेळ पन्नास विद्यार्थी बसस्थानकात होते. नियमीत बससेवा उपलब्ध करून द्या. अन्यथा तिव्र आँदोलन करण्याचा इशारा यावेळी विद्यार्थानी दिला. गोंडपिपरी तालूक्यातील मुलभुत समस्या सोडविण्यात लोकप्रतिनीधी अपयशी ठरत आहेत. प्रशासन झोपेत आहे.यामुळे गावखेड्यातील विद्यार्थ्यांवर शिक्षणासाठी बारा बारा किलोमीटर पायदळ प्रवास करण्याची दुर्दैवी पाळी आली आहे. - सुरज माडूरवार, तालुकाध्यक्ष रायुका गोंडपिपरी

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Fifty students walked for twelve hours to go to college