ईव्हीएम बंद होतपर्यंत रस्त्यावर लढा

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर : लोकसभा निवडणुकीत कुणाचाही विश्‍वास बसणार नाही, असा धक्कादायक निकाल लागला. यामुळे मतदारही अचंबित आहेत. तर निवडून आलेल्यांनाही विश्‍वास नसून पराभूतांना मोठा धक्का बसला आहे. गत दोन महिन्यांपासून यावर देशभरात चर्चा होत असताना निवडणूक आयोग त्यावर व्यक्त होताना दिसत नाही. "इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम'च्या बॅनरखाली संविधान चौक येथे विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारत बॅलेटवरच निवडणुका घेण्याची मागणी केली. ईव्हीएमविरोधात संतप्त भावना व्यक्त करीत देशभर लढा उभारण्याचा संकल्पही करण्यात आला.

निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे. प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमचा शोध लावला असतानाही त्याचा वापर करीत नसून तेथे बॅलेटवर निवडणुका होतात. याचाच अर्थ ईव्हीएममध्ये फेरफार करता येते, हे सिद्ध होते. सत्ताधारी भाजप वगळता इतर सर्व राजकीय पक्ष ईव्हीएमविरोधात आहे. त्यानंतरही निवडणूक आयोगाचा एककल्ली कारभार सुरू आहे. ईव्हीएम विरोधात जनमानस असताना त्याकडे दुर्लक्ष होत असून आता त्या विरोधात लोकलढाच उभारावा लागेल, असा सूर येथे उपस्थित मान्यवरांचा होता. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनात आमदार सुनील केदार, आमदार प्रकाश गजभिये, कॉंग्रेस नेते किशोर गजभिये, अतुल लोंढे, अनीस अहमद, नंदा पराते, प्रशांत पवार, नरेंद्र जिचकार, भारिपचे विशाल गोंडाणे, एसएसडीच्या ऍड. स्मिता कांबळे, आरपीआयचे मनोज संसारे आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com