खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची मागणी 

File FIR against Navneet Rana and Ravi Rana seek Shivsena leader
File FIR against Navneet Rana and Ravi Rana seek Shivsena leader

चिखलदरा (जि. अमरावती) : अमरावती जिल्हाचे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे होळीचा सणा निमित्ताने मेळघाट दौऱ्यावर असुन या मध्ये खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आदिवासी बांधवांच्या भावनां दुखावल्या गेल्या आहे.  असा आरोप केला जात आहे

प्राप्त माहितीनुसार दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण महाराष्ट्रात चांगलाच गाजत असल्याने dfo विनोद शिवकुमार बाबत वेगवेगळ्या रुपाने नारे लागत आहे. नवनीत राणा यांनी तर आदिवासी बांधवांच्या दैवताचा अपमान केल्या गेल्या असल्याचे दिसुन येत आहे.

हरिसाल गावातील  होळी दहन करता वेळी शिवकुमार व रेड्डींचा पोस्टर लावून त्यावर चप्पल चा हार घातला यामुळे मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या भावनां दुखावल्या गेल्या असल्याने चिखलदरा येथिल शिवसेनेचे तालुकाप्रमुख साधुराम शंकरजी पाटील व कार्यकर्ते यांनी नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध 295नुसार गुन्हा दाखल करण्यात यावे अशी तक्रार पोलिस स्टेशन चिखलदरा येथे दिली आहे.

तसेच मेळघाट क्षेत्राचे आमदार राजकुमार पटेल यांनी पण खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आदिवासी बांधवांच्या भावनां दुखावल्या आहे या बद्दल नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे व मि नवनीत राणा व आमदार रवी राणा याचा निषेध करतो असे म्हणने आमदार राजकुमार पटेल यांचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com